वैजापूर बसस्थानकाने महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवारने प्रभावित झ्याल्याचा अनुभव जनतेस येत आहे, एस टी चे चालक मोठ्या कसरतीने बस बसस्थानकात आणतात यात त्यांची मोठी तारांबळ उडते , मोठ्या व्यासाच्या खड्यामुळे एक तलाव अवतरीत झाला असून प्रवाशांना बसस्थानकात प्रवेश करणे अवघड होउन बसले आहे, प्रवासी बसस्थानकात प्रवेश करतांना एखादी बस आलीरे आली तो प्रवासी संपूर्ण भिजल्याशिवाय राहत नाही त्यामुळे एस. टी. महामंडळ वैजापूर यांच्या जलयुक्त शिवारला शिव्यांची लाखोली दिल्याशिवाय प्रवासी राहत नाही ,
वैजापूर बस्थानकात जलयुक्त शिवार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jul 2018, 5:40 am