दिल्लीगेटदिल्लीगेट भागात शमी गणपती मंदिराजवळ एका ठिकाणी नाली खचली होती. त्यामुळे तेथे खड्डा पडला होता. हा खड्डा धोकादायक बनला असल्याची बातमी 'सिटीझन रिपोर्टर'मध्ये प्रकाशित करण्यात आली. त्याची दखल घेत महापालिकेने तेथे तात्पुरती दुरूस्ती केली आहे. हा खड्डा आता तात्पुरत्या स्वरुपात बुजविण्यात आल्याने तूर्त धोका टळला आहे. मात्र, यावर कायम स्वरूपी उपाय करून पुन्हा खड्डा पडणार नाही, अशी दुरूस्ती करण्याची गरज आहे. 'महाराष्ट्र टाइम्स' आणि महापालिका दोघांनाही धन्यवाद.- सोमनाथ सूर्यवंशी
फुटलेल्या चेंबरची दुरूस्ती
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jul 2017, 5:32 am