ठाणे -पूर्व येथील धोकादायक स्पीडब्रेकरठाणे -पूर्व भागात स्टेशन पासून मिठागर रोडवर दोन्ही बाजूला जे स्पीडब्रेकर ते आवश्यकतेपेक्षा मोठे व रुंद आहेत .त्यावर मोठे खड्डे पडल्यामुळे ज्यांना त्याची कल्पना नसेल त्यांना हमखास अपघात होण्याची शक्यता आहे आहे .जे रिक्षावाले येथून नियमित प्रवास करतात त्यांना तर हया स्पीडब्रेकर मुळे पाठदुखी सुरु झाली आहे .हे स्पीडब्रेकर नसून बोनब्रेकर आहेत .स्क्यायवाक जेथे समाप्त होतो तेथे जिन्याजवळ असलेल्या स्पीडब्रेकरवर तर खूप खड्डे आहेत .लकरात लवकर ते दुरुस्त करावेत हीच अपेक्षा .दिलीप प्रभाकर गडकरीकांचनगंगा सोसायटी ठाणे पूर्वमो .९९७०१९७६६६
धोकादायक स्पीड ब्रेकर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2018, 5:47 am