ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फलाट क्रमांक २ बाहेर जवळच सकाळी साधारणपणे ७:४५ पासून एक मेदु वडा, डोसा विकणारी गाडी अवैधरित्या ऊभी असते. हा परिसर नेहमीच गजबजीचा असतो. त्यातच रेल्वे आल्यानंतर प्रवाशांची राज्य परिवहन मंडळाच्या बस पकडायची घाई आणि काहींची स्थानकात जायची लगबग त्यामुळे इथे राज्य परिवहन मंडळाच्या बसची तसेच ठाणे महानगर परिवहन मंडळाच्या बसची धडक लागुन अपघाताची शक्यता आहे. तरी लवकरात लवकर त्या अवैधरित्या चालणाऱ्या गाडीवर कारवाई व्हावी. एक दक्ष नागरिक
वाट शोधणे कठीण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2019, 5:41 am