स्वस्तिक चौकनगर-पुणे महामार्गावर जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी महापालिकेतर्फे खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण झाल्यानंतर खड्डा तात्पुरता बुजविण्यात आला होता. त्या ठिकाणी कोणतीही सूचना लावण्यात आली नव्हती. तेथून जाणाऱ्या कंटेनर चालकाला खड्डा असल्याचे लक्षात आले नाही. त्यामुळे कंटेनर खड्ड्यात फसला. कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा या अपघाताला कारणीभूत आहे. खोदकाम करताना आणि काम झाल्यानंतर खड्डा पक्का बुजविला जाऊपर्यंत तेथे सूचना आणि कठडे उभारण्याची दक्षता घेणे आवश्यक आहे.- अजय कविटकर
कंटेनर खड्ड्यात अडकला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2017, 5:30 am