श्री कृष्ण नगर जवळील एका जुन्या कार कंपनीच्या बंद पडलेल्या शोरूमच्या समोरील रिकाम्या जागेत लोकांनी आता कचरा टाकायला सुरूवात केली आहे. सध्या पावसाचे दिवस असल्याने हा कचरा कुजला असून त्यातून दुर्गंधी पसरते आहे. यामुळे सार्वजनिक आजारांना निमंत्रण मिळू शकते महापालिकेच्या संबंधित विभागाने यावर योग्य ती कार्यवाही करावी. या जागेत एखादे उद्यानही साकारता येईल.
रिकाम्या जागेतील कचरा हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2019, 5:44 am