नवी पेठनवा रस्ता लगेच खोदला पत्रकार भवन येथून गरवारे पुलाकडे जातानाच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पथ विभागाने अगदी गेल्याच आठवड्यात सुंदर डांबरीकरण केले. त्यानंतर त्यावर पांढरे पट्टेदेखील रंगवण्यात आले. मात्र, लगेचच पोकलेन मशीन येऊन पुलाजवळील वैकुंठ स्मशानभूमीत जाणाऱ्या बाजूने पत्रकार भवनच्या दिशेने रस्ता खोदायला सुरवात झाली आहे. पालिकेच्या यंत्रणेत समन्वय नाही का ?विश्वास चव्हाण
नवा रस्ता लगेच खोदला
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Mar 2019, 5:39 am