उजवी भुसारीत एक नामांकित शोरूमच्या मागील बाजूस कचरा टाकू नये. अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल असा मोठा फलक पुणे महापालिकेने लावला आहे. तेथेच कचऱ्याचे ढीग साठलेले असतात. पावसामुळे कचरा कुजून दुर्गंधी सुटली आहे. फलक लावणारा संबधीत विभाग कारवाई कोणावर करणार? या भागात जवळपास सीसीटीव्ही कॅमेरा नाही. योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
उजवी भुसारीत कचऱ्याचे साम्राज्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Sep 2021, 5:32 am