जांभुळवाडी रस्त्यावर मोडकवस्तीमध्ये महापालिकेची राखीव मोकळी जागा (अमेनिटी स्पेस) आहे. महापालिका आणि संबंधित खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे. नागरिक कचरा टाकतात, झाडे झुडूपे अस्ताव्यस्त बेफाम वाढली आहेत. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते. महापालिकेच्या अॅपवर तक्रार दिल्यावर आम्ही काम करू शकत नाही, असे उत्तम मिळाले आहे. महापालिकेच्या संबधित खात्यांचा नाकर्तेपणा आहे.
मोडक वस्ती मधील मनपाच्या मोकळ्या जागेचा कचरा हलवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2021, 5:32 am