कर्वे रस्त्याशेजारील कालवा रस्त्यावर यश एलिना सोसायटीच्या समोर हा कचरा साठला आहे. महापालिकेचे कर्मचारी या ठिकाणी कचरा साठवतात. त्यामुळे येणारे जाणारे नागरिकही तिथेच ओला आणि सुका कचरा फेकतात. महापालिकेचे कर्मचारी दररोज कचरा उचलत नाहीत. रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास होतो आहे. महापालिकेने कचरा साठविण्यासाठी बंदी करावी.
रस्त्यावर कचराच कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Nov 2021, 5:32 am