शनिवारवाड्याजवळील देसाई कॉलेज समोर अनेक दिवसांपासून विद्युत खांब धूळखात पडला आहे. त्या ठिकाणी दररोज केरकचरा टाकला जातो. यामुळे दुर्गंधी पसरते. शनिवारवाड्याचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी तेथील विद्युत खांब तातडीने हटवावेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घ्यावी.
शनिवारवाड्याशेजारील खांब काढावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2022, 5:30 am