पुणे : येथील कमला नेहरू पार्कच्या बाहेरील अतिक्रमणे काही महिन्यांपूर्वी पालिकेने काढून टाकली होती. त्यामुळे पादचाऱ्यांना व नागरिकांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा नव्याने पार्कच्या बाहेर हातगाड्या लागलेल्या दिसत आहेत. या गाड्यांवर पदार्थ तळणे, भाजणे इत्यादी कामे सतत चालू असतात. पालिकेने पुन्हा कारवाई करावी व संबंधितांचे योग्य पुनर्वसन करावे.
- प्रीतम चिंचणे
- प्रीतम चिंचणे