वृंदावन नर्सरी समोरील रस्त्यावर माहितीच्या फलकासमोर व्यवसायिक जाहिरात लावण्यात आली आहे. यामुळे माहिती फलक झाकला गेला असून लोकांची गैरसोय होते आहे. महापालिकेच्या संबंधित विभागाने हा फलक काढून बांधकामाचे अतिक्रमणही हटवावे. काँक्रीट रस्त्यावरील पार्किंग आणि व्यवसाय थांबवावेत, अतिक्रमण विभागाने कारवाई करावी. यामुळे वाहतूक सुरळीत होईल.
रस्त्यावरच नव्हे माहितीच्या फलकावर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jan 2021, 5:31 am