मांजरी रोडला फलकांचे अतिक्रमण झाले आहे. केशवनगर पीएमसी मध्ये जाऊन एक वर्ष झाले आहे. तरी या विभागाकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. मांजरीकडून मुंढवा चौकाकडे येणाऱ्या वाहनांना ट्रॅफिकला समोर जावे लागत आहे. मुंढवा चौकात उड्डाण पुलाची गरज असताना नदीवरचा पूल बनवला आहे. मुंढवा चौकात नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे.
मुंढवा मांजरी रोडवर अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Feb 2019, 5:40 am