फुरसुंगी भागात भेकराई नगर भागातील भेकराई माता मंदिराजवळ न्यू इंग्लिश स्कूल शाळेत समोर अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्याच्या एकाबाजूला कचरापेटी वाटावी एवढा कचरा पसरला आहे. या कचऱ्याचा उग्र वास येत आहे. जवळ शाळा आहे, विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा प्रकार धोकादायक आहे. या संदर्भात महापालिकेचे घन कचरा विभागाने त्वरित नियोजन करून स्वच्छता करावी ही अपेक्षा.
कचरा समस्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Feb 2021, 5:33 am