पुणे : नव्या सांगवीतील त्रिमूर्ती चौकाजवळील कचऱ्याविषयी सिटिझन रिपोर्टरच्या माध्यमातून आवाज उठविला होता. त्या विषयीच्या वृत्ताची दखल घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेने तातडीने हा कचरा साफ केला; तसेच या ठिकाणी कचराकुंडीही ठेवली. त्यामुळे सांगवीच्या प्रवेशद्वारासमोरच दिसत असलेली कचऱ्याची समस्या तूर्तास दूर झाली आहे. आता नागरिकांनी कचरा या कचराकुंडीमध्येच टाकण्याची आपली जबाबदारी लक्षात घ्यायला हवी. थँक्यू मटा.
-महेश भोसले