खासगी जाहिरातींवर बंदी हवीनवनवीन तंत्रज्ञानामुळे जाहिरातीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असतांना फलकावरील अधिकृत किंवा बेकायदेशीर वैयक्तिक, खाजगी जाहिरातीवर पूर्णपणे बंदी असावी. फलकावरील जाहिरातीमुळे शहराचे विद्रुपीकरण होते, फलक ज्या ठिकाणी लावण्यात येतात, त्या सांगाड्यांची वर्षानुवर्षे तपासणी होत नाही, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी होत नाही. अशा वेळी ज्या स्थानिक नगरसेवकांच्या प्रभाग क्षेत्रात बेकायदेशीर जाहिरात फलक दिसेल त्यांच्याकडून कायदेशीर जाहिरातीच्या दहापट दंड जाहिरात धारकाकडून अथवा नगरसेवकाकडून वसूल करावा. या कामासाठी एजंट नेमावेत. डी. एस. हेडाऊ
खासगी जाहिरातींवर बंदी हवी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Apr 2019, 5:42 am