इंदिरानगर लोवर भागातील पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. इंदिरानगर कमान ते माने चौक या पदपथाचे नुकतेच स्मार्ट सिटी कंपनीने नुतनीकरण केले आहे. मात्र आता पदपथावर आणि नो पार्किंग च्या ठिकाणी दुकानदारांनी अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम केले आहे. खाद्यपदार्थ, भाजीच्या हातगाड्यांनी रिकामा परिसर व्यापला आहे, प्रशासनाने दखल घ्यावी.
इंदिरानगर लोवर पदपथावरील अतिक्रमणे हटवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Jan 2021, 5:31 am