सासवड मार्गावरील सातववाडी गोंधळे नगर येथील सायकल मार्गावरच दुचाकी लावल्या जात आहेत. सायकलसाठी असणारा स्वतंत्र मार्ग दुचाकींनी बंद झाल्याने सायकल चालकांना मात्र मुख्य रस्तावर येऊन कसरत करावी लागते.सायकल मार्गावरील अतिक्रमणाकडे वाहतूक पोलिस कानाडोळा करीत असल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत .या मार्गावरील वाहने हटवून सायकल मार्ग खुला करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
सायकल मार्गावर दुचाकींचा वाहन तळ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Feb 2019, 5:39 am