सायकल मार्गात दुचाकी, चार चाकी, रिक्षा पार्क केलेल्या शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. फक्त वाहतूक पोलीस विभागासच त्या कशा दिसत नाहीत असा प्रश्र्न पडतो. तसेच रिक्षा व इतर तिनचाकी वाहने चालक बिनधास्त सायकल मार्गातून चालवतात. वाहतूक पोलीस विभागाने किरकोळ बाबतीत कारवाई करण्याचे सोडुन अशा बहाद्दरांना पकडावे. पोलिस आयुक्त यांनी याची दखल घ्यावी.
सायकल मार्गात वाहनांचे अतिक्रमण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2018, 5:39 am