पर्वती परिसरातील गाळे कुलुपबंदच पुणे - पर्वतीच्या उड्डाणपुलाखाली महापालिकेने काही गाळे बांधले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे गाळे बंद अवस्थेत आहेत. पलिकडे असणारा आंबील ओढा व एकेरी रस्ता यामुळे येथे व्यवसाय चालणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य करदात्यांच्या पैशाचा हा अपव्यय झाला आहे. यासाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार का ?राजेंद्र देशपांडे
करदात्यांच्या पैशाचा अपव्यय
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2017, 5:33 am