अ‍ॅपशहर

बंदुकीच्या धाकावर मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेनं घेतला गळफास

अल्पवयीन मुलीला बंदुकीचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिने आत्महत्या केली आहे. राजस्थानमधील धौलपूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2020, 5:58 pm
धौलपूर: घरात झोपलेल्या १४ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर मानसिक धक्का बसलेल्या पीडितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. राजस्थानमधील धौलपूर येथे ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, पीडितेनं घेतला गळफास


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी पळून जाणाऱ्या आरोपीला पकडले आणि त्याला झाडाला बांधून ठेवले. कुटुंबीयांनी आरोपीला बसेडी पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या वडिलांनी दोन्ही आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी रुग्णालयात नेला. आरोपींविरोधात बलात्काराचा आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी घरात झोपली होती. काल मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास मुलीच्या खोलीतून किंचाळण्याचा आवाज आला. आवाज ऐकून घरातील इतर सदस्य झोपेतून जागे झाले. खोलीचा दरवाजा उघडल्यानंतर शेजारी गावातील बंटी आणि हरिकेश हे शस्त्रांसह खोलीतून बाहेर निघाले. दोघे आरोपी पळून जात होते. कुटुंबीयांनी त्यांचा पाठलाग केला. त्यांनी बंटीला पकडले. तर दुसरा आरोपी हरिकेश हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला.

आरोपींना पकडून दिला चोप

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, घटनेनंतर पळून जाणाऱ्या एका आरोपीला पीडितेच्या कुटुंबीयांनी चोप दिला. त्याला झाडाला बांधले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दुसरीकडे बलात्काराच्या घटनेमुळे मानसिक धक्का सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने घरात पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आणखी बातम्या वाचा:

मुंबईहून २ मॉडेल्सना इव्हेंटसाठी बोलावले, इंदूरमध्ये सामूहिक बलात्कार

वहिनीने केला 'हा' गंभीर आरोप, मानसिकदृष्ट्या खचलेल्या दिराने केली आत्महत्या

थरारक! तरुणाच्या डोळ्यांत मिरचीपूड फेकली, तलवारीने सपासप वार

तरुणीवर तृतीयपंथीयाने केले अनैसर्गिक अत्याचार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज