अ‍ॅपशहर

पालघर: गुरे चारायला गेलेल्या आदिवासी मुलीवर शेतात बलात्कार

पालघरमधील मनोरमध्ये एका १६ वर्षीय आदिवासी मुलीवर शेतात बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्यावेळी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Oct 2020, 4:16 pm
पालघर: गुरे चारण्यासाठी गेलेल्या १६ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मनोरमध्ये ही घटना घडली. या घटनेनंतर पीडित मुलीसह कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पालघर: गुरे चारायला गेलेल्या आदिवासी मुलीवर शेतात बलात्कार


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील मनोरमध्ये २१ ऑक्टोबरला ही घटना घडली. पीडित मुलगी गुरे चारायला शेतावर गेली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला फरफटत नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे अनोळखी व्यक्तीविरोधात कलम ३७६ आणि पॉक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

'रिपब्लिक'च्या अडचणींत वाढ; आरोपींनी दिली 'ही' धक्कादायक माहिती

महिलेने पतीचा केला पाठलाग, त्याची गर्लफ्रेंड येताच केला हल्ला

बिल्डर केबिनमध्ये पैशांची बॅग ठेवून गेला, बाहेर पडताच...

धक्कादायक! पोलिसाच्याच मुलाचे केले अपहरण; नागपुरात खळबळ

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज