अ‍ॅपशहर

'सिऱ्याक्को स्टाइल' संभोग जिवावर बेतला; प्रेयसीसमोरच प्रियकराचा मृत्यू

नागपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सिऱ्याक्को स्टाइल संभोग करणे एका तरूण अभियंत्याच्या जीवावर बेतले आहे. संभोग करताना गळ्याभोवती दोरीचा फास आवळला गेल्याने तरुणाचा मृत्यू झाला.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jan 2021, 11:37 am
नागपूर: ‘सिऱ्याक्को स्टाइल’ संभोग करणे प्रियकराच्या जिवावर बेतले. संभोग करताना गळ्याभोवती दोरीचा फास आवळला गेल्याने प्रियकराचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरूवारी रात्री खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथे उघडकीस आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. जियाउद्दीन (वय २७, रा. टेकानाका) असे मृतकाचे नाव आहे. जियाउद्दीन हा अभियंता असून तो बेराजगार होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम सिऱ्याक्को स्टाइल संभोग जिवावर बेतला; प्रेयसीसमोरच प्रियकराचा मृत्यू


विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गत काही वर्षांपासून त्याचे २६ वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. ती खासगी कंपनीत कार्यरत आहे. दोघे अनेकदा एकांतात भेटले. गुरूवारी दुपारी जियाउद्दीन हा तरुणीला घेऊन दहेगाव रंगारी येथे आला. दहेगाव रंगारी येथे फिरल्यानंतर दोघेही लॉजवर गेले. त्यांनी खोली भाड्याने घेतली. त्यांनी मोबाइलवरच अश्लील चित्रपट बघितला. चित्रपटातील दृश्याप्रमाणे 'सिऱ्याक्को स्टाइल' संभोग करण्याचे ठरविले. तरुणीने त्याचे हातपाय दोरीने बांधले. गळ्याभोवती दोरीही आवळली. दोघांनी संभोग केला. संभोग केल्यानंतर तरुणी स्नानगृहात गेली. दहा मिनिटानंतर तरुणी स्नानगृहातून बाहेर आली. जियाउद्दीन हा खुर्चीवर होता. तिने त्याला आवाज दिला. जियाउद्दीन याने प्रतिसाद दिला नाही. तरूणीने जियाउद्दीनला जागे करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान जियाउद्दीन हा खुर्चीसह खाली पडला. त्याच्या गळ्याभोवती फास आवळलेला होता.

पुणे: मंडई गणपती मंदिरात चोरी, २०-२२ तोळे सोने पळवले; दानपेटीही फोडली

जियाउद्दीन प्रतिसाद देत नसल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच तरुणीने आरडाओरड केली. लॉज व्यवस्थापकासह कर्मचाऱ्यांनी खोलीत धाव घेतली. जियाउद्दीन मृतावस्थेत पडल्याचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांना दिसले. त्यांनी खापरखेडा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच खापरखेडा पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक सूर्यप्रकाश मिश्रा त्यांचे सहकारी गुरूप्रकाश मेश्राम, संतोष बैरागी आदींसह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जियाउद्दीनचा मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. तरुणीच्या माहितीवरून खापरखेडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज