अ‍ॅपशहर

८ वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह नदीकाठी फेकला, सिन्नरमध्ये खळबळ

नाशिकमधील सिन्नर तालुका हत्येच्या घटनेने हादरला. आठ वर्षीय मुलाची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर मृतदेह नदीकाठावर फेकला. पोलिसांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला आहे.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Dec 2020, 9:14 am
म.टा. वृत्तसेवा नाशिकरोड: शेजारी राहणाऱ्याकडून एका आठ वर्षीय बालकाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची खळबळजनक घटना नाशिकरोड येथे घडली. रामजी लालबाबू यादव (रा गाडेकर मळा, सामनगाव रोड, नाशिकरोड) असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. या मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह संशयिताने डूबेरे, (ता सिन्नर) येथील स्मशानभूमी परिसरात टाकून दिला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ८ वर्षीय मुलाची हत्या करून मृतदेह नदीकाठावर फेकला, सिन्नरमध्ये खळबळ


संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या या घटनेतील संशयितांनी हत्या झालेल्या मुलाचे त्याच्या राहत्या घरून भाजीपाला आणण्याच्या नावाखाली मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास एका चारचाकी वाहनातून अपहरण केले होते. त्यानंतर संशयिताने दुसऱ्या एका साथीदाराच्या साहाय्याने या मुलास कोटमगाव, हिंगणवेढे रस्त्याने सिन्नरच्या दिशेने नेले. रस्त्यात एका सुरक्षारक्षकाला लुटले. ही घटना घरी सांगतो असे रामजी यादव हा मुलगा म्हणाला. चोरी उघडकीस येईल या भीतीने संशयिताने रामजी यादव या मुलाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह डुबेरे येथील नदीत टाकल्याची प्राथमिक माहिती समजते.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक लॅबचे पथक यांनी मयत मुलाच्या घरी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या.


Rekha Jare : रेखा जरे यांच्या हत्येची दिली होती सुपारी

Nagpur Crime: सेक्सला नकार दिल्याने पत्नीची हत्या; नंतर बनाव रचला पण...

फ्लॅटमध्ये सुरू होतं सेक्स रॅकेट; पोलिसांनी 'असा' केला पर्दाफाश

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज