अ‍ॅपशहर

पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी शेजारचे दाम्पत्य गेले, अन्...

पती -पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या शेजारील दाम्पत्यालाच मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2020, 12:45 pm
म. टा. प्रतिनिधी, पुणे: शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दाम्पत्याला जबर मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पती-पत्नीचे भांडण सोडवण्यासाठी शेजारचे दाम्पत्य गेले, अन्...


उर्मीला प्रशांत फड (वय ३२) यांनी याबाबत तक्रार दिली. त्यानुसार महेंद्र शिवराम कदम (वय ३३), रवींद्र शिवराम कदम (वय ३६) आणि सौरभ सुरेश जाधव (वय २०) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या शेजारी आरोपी महेंद्र कदम पत्नीसोबत राहतो. शुक्रवारी रात्री कदम हा चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण करू लागला. त्यामुळे त्यांचा वाद सोडविण्यासाठी फड व त्यांचे पती गेले. त्या वेळी आरोपींनी कौटुंबिक भांडणात मध्ये कशाला पडता म्हणून फड दाम्पत्याला मारहाण केली, तसेच उर्मीला फड यांच्या मानेजवळ धारदार शस्त्राने वार केले. यामध्ये त्या जखमी झाल्या. या प्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

हैवानांपासून वाचण्यासाठी 'ती' मुलगी ३ दिवस २०० किलोमीटर चालली, हाथरसला पोहोचली धक्कादायक! १२ वीच्या विद्यार्थिनीवर क्लास चालकाने केले लैंगिक अत्याचाररामजानकी मंदिरातील पुजाऱ्यावर जीवघेणा हल्ला, पुजारी गंभीरMumbai Crime: कारचालकाचे भररस्त्यात अश्लील चाळे; तरुणीने दाखवले धाडस

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज