अ‍ॅपशहर

लॉकडाऊनमध्ये बेरोजगार तरुणीला नोकरीचे प्रलोभन; इंटरव्ह्यूला बोलावून केला बलात्कार

लॉकडाऊनच्या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणीला मुलाखतीला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थानमधील भरतपूरमध्ये घडली आहे. पीडित तरुणी मूळची हरयाणाची आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Sep 2020, 11:27 am
भरतपूर: करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. त्याचवेळी राजस्थानच्या भरतपूरमध्ये नोकरी देण्याच्या नावाखाली तरुणीला इंटरव्ह्यूला बोलावून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित २३ वर्षीय तरुणी एका कारखान्यात नोकरीला होती. लॉकडाऊनच्या काळात तिची नोकरी गेली होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम लॉकडाऊनमध्ये बेरोजगार तरुणीला नोकरीचे प्रलोभन; इंटरव्ह्यूला बोलावून केला बलात्कार


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची हरयाणाची आहे. जयपूरमध्ये ती राहत आहे. एका कारखान्यात ती नोकरी करत होती. लॉकडाऊनच्या काळात अनेक कारखाने बंद पडले. त्यामुळे तिलाही नोकरी गमवावी लागली. ती बेरोजगार होती. बरेच दिवस ती नोकरीच्या शोधात होती. भरतपूरमध्ये नोकरी असल्याचं तिला कळलं. तिने संबंधित व्यक्तीला फोन केला. त्याने इंटरव्ह्यूला बोलावून तिच्यावर बलात्कार केला.

आरोपी भरतपूरच्या बयाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहतो. अशोक मीणा असे त्याचे नाव आहे. तिला नोकरी देण्याचे प्रलोभन देऊन १० सप्टेंबरला तिला इंटरव्ह्यूसाठी जयपूरहून भरतपूरला बोलावले. सेंट्रल बस स्थानकातून अशोक तिला दुचाकीवरून घेऊन गेला. इंटरव्ह्यू संध्याकाळी असल्याचे त्याने सांगितले. तोपर्यंत देवदर्शन करून येऊ अशी बतावणी केली. दर्शन घेऊन परतल्यानंतर अशोक तिला इंदिरा नगर कॉलनीतील एका घरात घेऊन गेला. तिथे त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने तिला एका बसमध्ये बसवले आणि जयपूरला पाठवले. मात्र, ती पुन्हा भरतपूरला आली आणि महिला पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

आणखी बातम्या वाचा:

नागपूरमध्ये व्हाइटनरसाठी खून; बालगुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात

सुशांत-रिया ड्रग्ज कनेक्शन; सातही दलालांना एनसीबीकडून अटक

पिंपरी: एटीएम गॅस कटरने कापला, अवघ्या १० मिनिटांत साडेनऊ लाख पळवले

करोना, होम क्वारंटाइनचा बहाणा; 'शौकीन' पतीला पत्नीने तरुणीसोबत रंगेहाथ पकडले

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज