अ‍ॅपशहर

बिहारमध्ये खळबळ; निवडणूक रणधुमाळीत भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या

बिहारमधील पाटणा येथे मॉर्निंग वॉकला गेलेल्या भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. राजेश कुमार झा असे या नेत्याचे नाव आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 Oct 2020, 4:58 pm
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच, एक खळबळजनक घटना घडली आहे. पाटणा येथील दानापूरमध्ये एका भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी भाजप नेता राजेश कुमार झा यांची गोळ्या झाडून हत्या केली. ते मॉर्निंग वॉकला गेले होते. तेजप्रताप नगरमध्ये ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम बिहारमध्ये खळबळ; निवडणूक रणधुमाळीत भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या


पोलिसांच्या माहितीनुसार, गुंडांनी भाजप नेता राजेश कुमार झा यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. भाजप नेत्याच्या नातेवाइकांकडे पोलीस चौकशी करत आहेत. राजेश कुमार झा यांचे कुणासोबत वाद होते, याचा तपास केला जात आहे.

निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच भाजप नेत्याच्या हत्येने खळबळ उडाली आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आणि चौकशी पूर्ण झाल्यानंतरच याबाबत काही ठोस सांगता येईल, असे पोलीस म्हणाले.

आणखी बातम्या वाचा:


पुण्यात लॉजमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

घटस्फोटित महिलेवर पोलिसाने केले अत्याचार, अश्लील व्हिडिओ केला शूट

धक्कादायक! पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना

डान्सबारमधील तरुणीला ठाण्यातून पुण्यात आणले, तिच्यासोबत घडलं भयानक...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज