अ‍ॅपशहर

शाळकरी मुलीची हत्या करून मृतदेह बॅगेत भरणारे 'ते' दोन आरोपी कोण? पोलिसांकडून फोटो जारी

body in bag photos of two suspects released by cops: वसई स्टेशन परिसरातील रेल्वे पुलाखाली एका मुलीचा मृतदेह बॅगेत आढळून आला होता. या प्रकरणी वालीव पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. अंधेरी पूर्वेत वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृतदेह बॅगमध्ये आढळून आला होता. त्या प्रकरणातील दोन आरोपींचे फोटो वालीव पोलिसांनी जारी केले आहेत.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 30 Aug 2022, 8:39 am
मुंबई: वसई स्टेशन परिसरातील रेल्वे पुलाखाली एका मुलीचा मृतदेह बॅगेत आढळून आला होता. या प्रकरणी वालीव पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. अंधेरी पूर्वेत वास्तव्यास असलेल्या १५ वर्षीय मुलीचा मृतदेह बॅगमध्ये आढळून आला होता. त्या प्रकरणातील दोन आरोपींचे फोटो वालीव पोलिसांनी जारी केले आहेत. मृत मुलगी इयत्ता दहावीत शिकत होती.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम body of bag


वालीव पोलिसांनी आरोपींचे फोटो, त्यांची माहिती मुंबईसह ठाणे आणि नवी मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये पाठवली आहे. गुजरात पोलिसांनादेखील आरोपी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याचा तपशील पाठवण्यात आल्याचं पोलीस दलातील सुत्रांनी सांगितलं. संतोष मखवाना (२१ वर्षे) आणि विशाल अनबवणे (२१ वर्षे) अशी आरोपींची नावं आहेत. जुहूतील मोरेगाव येथील झोपडीत २५ ऑगस्टला १५ वर्षीय मुलीची हत्या झाली. तेव्हापासून दोन्ही आरोपी बेपत्ता आहेत.
देवपूजेत व्यत्यय आणल्यानं पत्नी, तीन मुली आणि वृद्ध आईची हत्या; परिसरात खळबळ
२५ ऑगस्टला मुलगी शाळेत जाण्यासाठी निघाली. विलेपार्ल्यातील शाळेत जाण्यासाठी मुलगी दुपारी सव्वा अकराच्या सुमारास अंधेरीतील तिच्या घरातून निघाली. तेव्हापासून ती बेपत्ता झाली. या प्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दोन आरोपींनी मुलीवर चाकूनं वार केले. तिला अनेकदा भोसकले. त्यानंतर त्यांनी तिचा मृतदेह बॅगेत भरला आणि ती बॅग वसईच्या परेरा नगर परिसरात टाकून दिली, अशी नोंद वालीव पोलिसांनी केली आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख