अ‍ॅपशहर

धक्कादायक! ड्रग्स तस्करीमध्ये BSF जवानाचा हात; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अंमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानाला अटक केली आहे. जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर हा जवान तैनात होता. पोलिसांनी त्याच्याकडील शस्त्रसाठा जप्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jul 2020, 1:18 pm
नवी दिल्ली : ड्रग्ज तस्करीप्रकरणी पंजाब पोलिसांनी सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानाला बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेला जवान ड्रग्ज तस्करी करत होता. जम्मू येथे आंतरराष्ट्रीय सीमेवर तो तैनात होता. पंजाब पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ड्रग्ज तस्करीप्रकरणी BSF जवानाला अटक


जम्मूमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर तैनात सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला (BSF Jawan arrested) पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. ड्रग्ज तस्करीप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली असल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. या जवानाकडून शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे. हा जवान पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये राहत आहे. या बीएसएफ जवानाचं नाव अद्याप समजू शकलेलं नाही. जम्मूमधील सांबा सेक्टरमध्ये तैनात बीएसएफ युनिटमधील हा जवान कार्यरत आहे. या जवानाकडून पिस्तुल, ८० बुलेट्स, ९ एमएमची गन, १२ बोर रायफल आणि ३ मोबाइल फोन हस्तगत करण्यात आले आहेत, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

ऑनर किलिंगच्या घटनेनं सांगली हादरला; मुलीच्या भावाने तरुणाला भोसकले धक्कादायक! पैशांसाठी सासरच्यांकडून छळ; महिलेची आत्महत्याVikas Dubey विकास दुबेच्या दोन साथीदारांना ठाण्यात अटक

३० किलो सोने तस्करी, एनआयएकडून दोघांना अटक

केरळमध्ये यूएईहून ३० किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एनआयएने आरोपी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांना बेंगळुरूहून अटक केली आहे. हे दोघे बेंगळुरूच्या बीटीएम लेआउट स्थित एका हॉटेलात लपले होते. शुक्रवारी एनआयएने या प्रकरणी यूएपीए अंतर्गत कलम १६, १७, १८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात स्वप्ना सुरेश, सरिथ, फाजिल फरीद आणि संदीप नायर हे आरोपी होते.

२४ तासांच्या आत धरपकड

केरळ सोने तस्करी प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर २४ तासांच्या आत एनआयएने आरोपी स्वप्ना सुरेश आणि त्याचा साथीदार यांचा ठावठिकाणा शोधला. रिपोर्टनुसार, आरोपीने क्रेडिट कार्डाचा वापर केला होता. त्यावरून पथकाने बेंगळुरूत त्यांना घेरले. तेथून दोघा आरोपींना पथकाने ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली जात आहे. हायप्रोफाइल सोने तस्करीच्या रॅकेटचा ५ जुलै रोजी पर्दाफाश करण्यात आला होता. ३० किलो २४ कॅरेटचं सोनं कस्टम अधिकाऱ्यांनी तिरुवनंतपुरम विमानतळावरून जप्त केलं होतं. या सोन्याची किंमत अंदाजे १४. ८२ कोटी रुपये होती.

पुणे: संपवून टाकेन, सूनेनं दिली सासूला धमकी; गळाही आवळला

भयानक! ५ वर्षीय मुलीवर बलात्कार, टॉर्चर करून विहिरीत फेकलं; मुलाचीही केली हत्या

'काश्मीरमध्ये सलग २ महिने रोज रात्री माझ्यावर बलात्कार झाला'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज