अ‍ॅपशहर

चंद्रपुरात गोवंशाची तस्करी; आरोपींंना अटक

गोवंशाची तस्करी करणाऱ्या ११ आरोपींना गडचांदूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. दोन आरोपी फरार त्यांचा शोध सुरू आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 14 Jun 2021, 5:35 pm
चंद्रपूर : गोवंशाची तस्करी करणाऱ्या ११ आरोपींना गडचांदूर पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. दोन आरोपी फरार त्यांचा शोध सुरू आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम चंद्रपुरात गोवंशाची तस्करी; आरोपींंना अटक


सावली येथून हैदराबाद येथे तीन ट्रकमधून गोवंश कत्तलीसाठी नेले जात असल्याची माहिती प्रभारी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली. त्यांच्या सूचनेप्रमाणे लाठी उपपोलिस स्थानकाचे पथक, नक्षलविरोधी अभियान पथकातील कर्मचारी यांनी नाकाबंदी करून नमूद वाहनांची तपासणी केली. या पोलिसांना ८६ जनावरे मिळाली. त्यांची किमत ८ लाख ४० हजार व ४० लाख रुपये आहे. सोबतच इतर ४९ लाख ४४ हजार रुपयांचा माल जप्त केला. जनावरांची सुटका करण्यात आल्यावर त्यांना लोहारा येथील उज्जल गोरक्षण संस्था येथे दाखल करण्यात आले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज