अ‍ॅपशहर

तुझ्या रक्षणाला मी समर्थ! बहिणीला दिलेला शब्द भावानं पाळला; घरापासून ५० मीटरवर जीव सोडला

Crime News: मध्य दिल्लीतील पटेल नगरात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. बहिणीच्या छेडछाडीला विरोध केल्यानं तीन मुलांनी १७ वर्षीय मुलाची चाकूनं भोसकून हत्या केली. जखमी मुलाला पोलिसांनी सरदार पटेल रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Oct 2022, 7:55 pm
दिल्ली: मध्य दिल्लीतील पटेल नगरात एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. बहिणीच्या छेडछाडीला विरोध केल्यानं तीन मुलांनी १७ वर्षीय मुलाची चाकूनं भोसकून हत्या केली. जखमी मुलाला पोलिसांनी सरदार पटेल रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी मृत मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन अल्पवयीन मुलांना अटक केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम delhi case


हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी सज्ञान आहे. पोलीस त्याला जाणूनबुजून पकडत नसल्याचा आरोप मृताच्या कुटुंबियांनी केला. मृताच्या कुटुंबियांनी पटेल नगर पोलीस ठाण्याला घेराव घालत पोलिसांचा निषेध केला. पोलिसांनी त्यांची कशीबशी समजूत काढली. मृत मुलगा मूळचा उत्तराखंडच्या अल्मोडामधील राणीखेतचा रहिवासी होता. तो कुटुंबासह बलजीत नगरातील कुमाऊ गल्लीत राहायचा.
प्रेयसीला भेटून घरी परतला, बेशुद्ध होऊन पडला; ११ दिवसानंतर मृ्त्यू, अखेर गूढ उकललं
मृत मुलाच्या कुटुंबात आई वडील आणि १५ वर्षांची बहिण आहे. मुलाचे वडील शादीपूर येथील एका कारखान्यात काम करतात. तर आई घराजवळच असलेल्या एका मोबाईल फोनच्या चार्जरच्या कारखान्यात काम करते. मृत मुलगा याच वर्षी बारावी पास झाला. त्यानंतर त्यानं आयटीआयमध्ये प्रवेश घेतला. घराशेजारी असलेलया एका इन्स्टिट्यूटमध्ये तो इंग्लिश स्पिकिंग कोर्स करत होता. संध्याकाळी त्याचा क्लास असायचा. रात्री ९ च्या सुमारास तो घरी परतायचा.
तुमच्यासोबत दारू प्यायचीय! माहेरी गेलेल्या पत्नीचा पतीला कॉल; १२ वर्षांच्या संसाराचा शेवट
शुक्रवारी रात्री क्लासवरून घरी जात असताना त्याला तीन जणांनी अडवलं. त्यावेळी तो घरापासून हाकेच्या अंतरावर होता. तिघांनी त्याच्याशी वाद घातला. प्रकरण मारामारीपर्यंत गेला. त्यांनी त्याच्या पोट, कंबर, मानेवर वार केले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. मात्र तोपर्यंत उशिरा झाला होता.

मृताच्या बहिणीची परिसरातील दोन-तीन मुलांनी छेड काढली होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे. बहिणीच्या छेडछाडीला मुलानं विरोध केला. त्यावरून वाद झाला. मुलानं छेड काढणाऱ्यांपैकी एकाच्या कानशिलात दिली होती. दिवाळीनंतर तुला बघून घेतो अशी धमकी मुलांनी दिली होती. तुझं रक्षण करायला मी समर्थ असल्याचा शब्द मृत मुलानं बहिणीला दिला होता. तो त्यानं अखेरच्या श्वासापर्यंत पाळला. भावाच्या निधनाबद्दल समजताच बहिणीनं आक्रोश केला.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख