अ‍ॅपशहर

याड लागलं! अभिनेत्रीच्या प्रेमात पडला तरूण, जेलमध्ये पोहोचला

अभिनेत्रीचा पाठलाग आणि तिला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. दिल्लीतील रोहिणी परिसरात हा तरूण राहतो. तो देखील याच परिसरात राहतो.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Aug 2020, 2:29 pm
नवी दिल्ली: एक २६ वर्षांचा तरूण अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. तिच्याशी लग्न करून संसार थाटायचा अशी स्वप्ने तो पाहू लागला. पण वरात घेऊन सासुरवाडीला जाण्याऐवजी तो थेट तुरुंगात पोहोचला. हा तरूण गुरुग्राममधील आहे. एका तेलुगू अभिनेत्रीचा तो बऱ्याच दिवसांपासून पाठलाग करत होता. मात्र, तिनं त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अभिनेत्रीच्या प्रेमात पडला, जेलमध्ये पोहोचला


२६ वर्षीय निखिल गंगवार हा तेलुगू अभिनेत्रीच्या आकंठ प्रेमात बुडाला होता. तो तिचा पाठलाग करत होता. ही अभिनेत्री दिल्लीच्या रोहिणी परिसरात आपल्या कुटुंबासह राहते. तिनं पोलिसांत तक्रार दाखल केली. तो इन्स्टाग्रामवर नेहमी मेसेज पाठवत असे. त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. त्यानंतर त्याने बनावट अकाउंट तयार करून तिला ट्रॅक करण्याचा प्रयत्न करत असे. लग्नासाठी तो तिच्यावर दबाव टाकतो होता. एक दिवस त्याने तिला धमकावण्यासाठी पिस्तूलचा फोटोही तिला पाठवला. आरोपी निखिलही रोहिणी परिसरातच राहतो. तो गुरुग्रामच्या एका कंपनीत रिसर्च केमिस्ट म्हणून काम करतो. २०१६ पासून तो या अभिनेत्रीला सोशल मीडियावर फॉलो करत आहे. तो या अभिनेत्रीच्या प्रेमात पडला. त्याने अनेकदा तिला लग्नासाठी प्रपोझ केला. पण तिनं नकार दिला. उलट तो तिला मेसेज करू लागला. तसंच बदनामी करण्याची धमकी त्यानं दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

धक्कादायक! मुकबधीर-अंध वृद्ध सासूला सूनेनेच जंगलात फेकले

अट्टल गुन्हेगार महिनाभरापूर्वी जामिनावर सुटला, अन्...


पोलिसांनी गंगवारच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. त्याला अटक करण्यात आली आहे. तो या अभिनेत्रीचा घरापर्यंत पाठलाग करायचा, अशी कबुली त्याने चौकशीदरम्यान दिली. गंगवारने तिला धमकावले असले तरी, त्याच्याकडे कोणतीही शस्त्रे सापडली नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जोधपूरमध्ये एकाच कुटुंबातील ११ पाकिस्तानी शरणार्थींचा मृत्यू

पुणे: उच्चशिक्षित तरुणीवर फॅमिली डॉक्टरने केला बलात्कार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज