अ‍ॅपशहर

मी अमित शहांचा PA बोलतोय, मंत्र्यांना फोन केले अन्...

अमित शहांचा पीए असल्याचे सांगून राजस्थान आणि हरयाणाच्या मंत्र्यांना फोन करणाऱ्या तरुणाला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. राजस्थानच्या अलवर येथून या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jul 2020, 3:55 pm
नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे नेते अमित शहा यांच्या तोतया स्वीय सहायकाला (पीए) दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. संदीप चौधरी असं त्याचं नाव आहे. त्याला अलवर येथून अटक केली आहे. अमित शहा यांचा पीए असल्याचं त्यानं राजस्थानचे कायदा मंत्री आणि हरयाणाच्या कामगार मंत्र्यांना फोनवरून सांगितलं आणि एका व्यक्तीला नोकरीवर पुन्हा नियुक्त करा, असे आदेश दिले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम अमित शहांचा पीए असल्याची बतावणी, तरुण अटकेत


सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप चौधरीनं स्वतःसाठीच नोकरीची शिफारस केली होती. त्याला लॉकडाउनच्या काळात नोकरीवरून काढले होते. तो एक प्रसिद्ध खासगी कंपनीत नोकरी करत होता. संदीपनं फोन केल्यानंतर राजस्थानच्या कायदा मंत्र्यांच्या कार्यालयातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयात फोन करून संदीप चौधरीबद्दल माहिती दिली. त्यानंतर या ठिकाणी या नावाचा कुणीच काम करत नाही किंवा येथून कुणीही अशा प्रकारचा फोन केला नाही, असं अमित शहांच्या कार्यालयातून त्यांना सांगितलं होतं. अमित शहा यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून अलवरजवळून आरोपी संदीप चौधरीला अटक केली. त्याची चौकशी करण्यात येत आहे. या मंत्र्यांच्या व्यतिरिक्त अशा प्रकारचे फोन त्याने कुणाकुणाला केले होते, याबाबत तपास करण्यात येत आहे.

लॉकडाउनमुळं बिझनेस ठप्प; गुजरातमध्ये २४ तासांत ३ व्यापाऱ्यांच्या आत्महत्या

लज्जास्पद! ३ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, हत्येनंतर मृतदेह धरणात फेकला


दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, मंत्र्यांच्या माध्यमातून हरयाणा किंवा राजस्थानच्या एमआयडीसी क्षेत्रातील एखाद्या कंपनीत नोकरी मिळवण्याचा संदीप चौधरी याचा प्रयत्न होता. त्याच्याकडून फोन आणि सीमकार्ड जप्त करण्यात आला आहे. संदीपनं ज्या क्रमांकावरून फोन केला होता, तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या नावावर आहे.

हिंदू असल्याचं सांगून जाळ्यात ओढले; मायलेकीच्या हत्येनंतर मृतदेह घरातच पुरले

औरंगाबाद: सावकारांचा जाच असह्य; माजी सरपंचाची आत्महत्या

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज