अ‍ॅपशहर

धक्कादायक! नगरमध्ये महिलेचा गर्भपात; डॉक्टरला केली अटक

महिलेचा बेकायदा गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. नगरमधील जखणगाव येथे काल रात्री उशिरा हा धक्कादायक प्रकार घडला. हॉस्पिटलमध्ये रात्री उशिरा महिलेचा गर्भपात केला जात आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jun 2020, 12:00 pm
म. टा. प्रतिनिधी, नगर: महिलेचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील जखणगाव येथे घडला आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. शंकरप्रसाद दिगंबर गंधे (वय ५०) याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री उशिरा ही कारवाई केली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम महिलेचा गर्भपात केल्याप्रकरणी डॉक्टरला अटक


जखणगाव येथील गंधे हॉस्पिटलमध्ये काल रात्री उशिरा एका महिलेचा बेकायदा गर्भपात केला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक महिला त्या ठिकाणी आढळून आली. चौकशी केली असता त्या महिलेचा गर्भपात केला असल्याचा संशय आला. त्यामुळे पोलिसांनी तातडीने या घटनेबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांना माहिती दिली. डॉ. मुरंबीकर यांनी पथकासह हॉस्पिटलमध्ये येऊन पाहणी केली. त्यावेळी डॉ. गंधे याने महिलेचा बेकायदा गर्भपात केला असल्याचे उघड झाले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व नगर तालुका पोलिसांनी डॉक्टर गंधे याला अटक केली. गंधे याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भोजपुरी गायकाची निर्घृण हत्या; मृतदेह वाळूच्या ढिगावर फेकला, पाटण्यात संताप

नागपुरात सशस्त्र गुंडांचा रात्रभर धुमाकूळ; वाहनांची तोडफोड, लुटपाट धावत्या बसमध्ये महिलेवर बलात्कार, २ आरोपींना अटक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज