अ‍ॅपशहर

मुंबई: सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला NCBने केली अटक, कोकेनची १६ पाकिटे जप्त

मुंबईत एनसीबीने गुरुवारी मोठी कारवाई केली. एका सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला अटक केली. त्याच्यासह नायजेरीयन टोळीसाठी काम करणाऱ्या रिक्षाचालकालाही अटक केली आहे. त्यांच्याकडून कोकेनची १६ पाकिटे जप्त केली आहेत.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2020, 4:52 pm
मुंबई: बॉलिवूड आणि ड्रग कनेक्शन उघड झाल्यानंतर एनसीबीने सुरू केलेली धडक कारवाई अद्याप सुरूच आहे. एनसीबीने काल मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश केला असतानाच, आज (गुरुवारी) पुन्हा धडक कारवाई केली आहे. पथकाने अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा येथून सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला अटक केली आहे. तर त्याच्यासोबत एका रिक्षाचालकालाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून कोकेनची १६ पाकिटे जप्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम मुंबई: सेलिब्रिटी हेअरस्टायलिशला NCBने केली अटक, कोकेनची १६ पाकिटे जप्त


मिळालेल्या माहितीनुसार, सूरज असे या सेलिब्रिटी हेअरस्टायलिशचे नाव आहे. तर लालचंद्र यादव असे ड्रग विक्री करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ड्रग्ज तस्करांचे बॉलिवूड कनेक्शन समोर आल्यानंतर एनसीबीने धडक कारवाई सुरू केली आहे. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतील ड्रग नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. अडीच कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त केले असून, ड्रग सप्लायरसह दोघांना अटक केली होती. आज गुरुवारी सकाळी एनसीबीने गोडांबे याच्यासह ड्रग विकणाऱ्या रिक्षाचालकालाही अटक केली.



मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील ओशिवरा परिसरातून त्यांना अटक केली. दोघांना कोर्टात हजर करण्यात आले. त्यांना कोर्टाने १६ डिसेंबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली आहे. एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. अटक केलेला सूरज याने बॉलिवूडमधील अव्वल सेलिब्रिटी आणि प्रॉडक्शन हाऊससाठी काम केल्याची माहिती मिळाली आहे. तर रिक्षाचालक यादव हा नायजेरियन टोळीसाठी काम करत असल्याचे समजते.

उद्योजक, डॉक्टरांना 'त्या' हनी ट्रॅपमध्ये अडकावायच्या अन्...

२० दिवसांपूर्वीच जामिनावर सुटून घरी परतला होता, त्यानंतर त्यानं...

नवी मुंबई: बंद फ्लॅटचे दार उघडले; आतले दृश्य बघून महिला हादरलीच!

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज