अ‍ॅपशहर

Gadchiroli : लग्नात दीडशेपेक्षा जास्त वऱ्हाडी; वधू-वरांचे पालक, आचाऱ्याविरोधात गुन्हा

करोना काळात लग्न सोहळ्यात २५ व्यक्तींच्या उपस्थितीला परवानगी दिली असली तरी, गडचिरोलीतील धानोरा येथील मरकेगावात लग्नाला दीडशेहून अधिक लोकांची उपस्थिती होती. त्यामुळे पोलिसांनी वधू-वराच्या पालकांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Apr 2021, 4:28 pm

हायलाइट्स:

  • कोविड १९ नियमांचे उल्लंघन
  • गडचिरोलीतील धानोरा येथे लग्नाला दीडशे लोकांची उपस्थिती
  • धानोरा पोलिसांनी वधू-वराच्या पालकांविरोधात दाखल केले गुन्हे
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Gadchiroli : लग्नात दीडशेपेक्षा जास्त वऱ्हाडी; वधू-वरांचे पालक, आचाऱ्याविरोधात गुन्हा
गडचिरोली: जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील मरकेगाव या ठिकाणी लग्न सोहळ्याला २५ हून अधिक व्यक्ती आढळून आल्याने स्थानिक कृती समितीने वधूवरांच्या आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा वेळी खबरदारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यानंतर राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. लग्न सोहळ्यात २५हून अधिक व्यक्ती एकत्रित येण्यास मनाई आहे. मात्र, या आदेशांचे उल्लंघन करत लग्न सोहळ्याला दीडशेपेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित आल्या होत्या. मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे आदी गोष्टी आढळून आल्याने स्थानिक कृती समिती, यामध्ये ग्रामसेवक, तलाठी, सरपंच व इतर समिती सदस्यांनी वधू-वरांचे आई-वडील यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

पुणे: विहिरीत आढळला होता तरुणाचा मृतदेह, तपासात धक्कादायक माहिती उघड

मरकेगाव येथे काल, शनिवारी लग्नसोहळ्यात कमाल २५ व्यक्तींची उपस्थिती अपेक्षित होती. परंतु, गावपातळीवरील कृती समितीत असलेले धानोरा तलाठी व तुकूम ग्रामसेवक, सरपंच आणि ग्रामपंचायत शिपाई यांनी पाहणी केली असता, या सोहळ्याला दीडशेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती असल्याचे आढळून आले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले. वर व वधूच्या आईवडिलांसह आचाऱ्याविरोधात समिती सदस्यांनी धानोरा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज