अ‍ॅपशहर

दोघांशी अफेअर; एकटी असताना एकाला बोलावलं, दुसऱ्याला समजलं, त्यानं घर गाठलं अन् मग...

west bengal crime news: एकाचवेळी दोघांशी प्रेमसंबंध ठेवणं एका अल्पवयीन मुलीला महागात पडलं आहे. एक प्रियकर घरात असताना दुसरा प्रियकर मुलीच्या घरी आला. त्यानं दोघांना एकत्र पाहिलं आणि गोळी झाडली. यामध्ये तरुणीच्या घरात असलेला प्रियकर जबर जखमी झाला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Sep 2022, 1:45 pm
आसनसोल: एकाचवेळी दोघांशी प्रेमसंबंध ठेवणं एका अल्पवयीन मुलीला महागात पडलं आहे. एक प्रियकर घरात असताना दुसरा प्रियकर मुलीच्या घरी आला. त्यानं दोघांना एकत्र पाहिलं आणि गोळी झाडली. यामध्ये तरुणीच्या घरात असलेला प्रियकर जबर जखमी झाला. पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये ही घटना घडली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम double dating


गोलापूरमधील परिसरातील एका फ्लॅटमधून बुधवारी संध्याकाळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला. त्यामुळे परिसरात खळबळ माजली. गोळीबाराचा आवाज ऐकून शेजारचे लोक जमले. घटनेची माहिती मिळताच पोलीस पोहोचले. त्यावेळी त्यांना फ्लॅटमध्ये २० वर्षांचा तरुण जमिनीवर रक्तबंबाळ अवस्थेत दिसला. त्याच्या जवळ उभी असलेली १३ वर्षांची मुलगी जोरजोरात ओरडत होती.
मीटिंग सुरूय, लगेच १९ लाख पाठव! व्हॉट्स ऍपवर एमडीचा डीपी; अकाऊंटंटला लावला चुना
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी घरी एकटी होती. त्यावेळी तिनं तिचा प्रियकर अंकित बर्मनला बोलावलं. याची माहिती मुलीचा दुसरा प्रियकर असलेल्या उज्ज्वलला समजली. तो प्रचंड संतापला. रागाच्या भरात तो लोडेड पिस्तुल घेऊन मुलीच्या घरी पोहोचला. तिथे त्याला अंकित मुलीसोबत दिसला. त्यानं अंकितवर गोळी झाडली आणि तिथून पळ काढला.
माझ्या लेकीचं अपहरण झालंय! बापानं पोलीस ठाणं गाठलं, पण सगळा बनाव उघडा पडला
गोळी अंकितच्या गालाला लागली आणि गळ्यात अडकली. त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. त्याच्यावर दुर्गापूर मिशन रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील काही तास महत्त्वाचे आहेत. घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिकांनी गोंधळ घातला. मुलगी आणि तिच्या आईविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी आई आणि मुलीला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेलं. पोलिसांनी उज्ज्वलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख