अ‍ॅपशहर

संभोग करताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव, हत्येतील आरोपी गर्लफ्रेंडला जामीन

संभोग करताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचणाऱ्या प्रेयसीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन दिला आहे. नागपूरच्या खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथे गेल्या महिन्यात ही धक्कादायक घटना घडली होती.

Edited byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Feb 2021, 11:42 am
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: पॉर्न बघून संभोगाचा विचित्र प्रकार अनुभवताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव रचून हत्या केल्याचा आरोप असलेल्या तरुणीची जिल्हा व सत्र न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम संभोग करताना प्रियकराचा मृत्यू झाल्याचा बनाव, हत्येतील आरोपी गर्लफ्रेंडला जामीन


ही घटना ७ जानेवारी रोजी खापरखेड्यातील दहेगाव रंगारी येथे उघडकीस आली होती. टेकानाका परिसरातील रहिवासी असलेल्या या दोघांचे गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणाच्या कुटुंबाचा या संबंधांना विरोध असल्याने त्याने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. तिच्यापासून त्याला एक महिन्याचा मुलगाही आहे. मात्र, त्याचे तरुणीशी प्रेमसंबंध कायम होते. या दोघांनी २०१९साली नोंदणी विवाह केल्याचा दावाही तरुणीने केला आहे.

'ती' कामावरून घरी परतत होती, इतक्यात तिच्याजवळ तरूण आला अन्...

तिच्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोघांनी दहेगाव रंगारी येथे लॉजवर खोली भाड्याने घेतली. मोबाइलवर पॉर्न बघितला. त्यातील दृश्यांप्रमाणे संभोग करण्याच्या प्रयत्नात या तरुणाचा मृत्यू झाला. मात्र, तरुणाच्या वडिलांनी 'प्रेयसीनेच माझ्या मुलाचा गळा आवळून खून केला', अशी तक्रार केली. खापरखेडा पोलिसांनी चौकशीअंती खुनाचा गुन्हा दाखल करीत तरुणीला अटक केली. तिने अॅड. अपूर्वा धवनकर आणि अॅड. एस. टी. चव्हाण यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यावर न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी तिची जामिनावर सुटका केली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज