अ‍ॅपशहर

ऑनर किलिंग; तरुणीसह तिच्या प्रियकराला कुटुंबीयांनी जिवंत जाळलं

तरुणीच्या कुटुंबीयांनी तिच्यासह प्रियकरालाही जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Aug 2020, 4:58 pm
बांदा: १९ वर्षीय तरुणी आणि तिच्या प्रियकराला तिच्या कुटुंबीयांनी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यात घडली आहे. हा ऑनर किलिंगचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ऑनर किलिंग; तरुणीसह तिच्या प्रियकराला कुटुंबीयांनी जिवंत जाळलं


उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील कर्चा गावात बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली. तरुणीच्या कुटुंबातील सदस्यांनी या दोघांना आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडलं होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली. कुटुंबीयांनी या दोघांना एका झोपडीत डांबून ठेवलं. त्यानंतर त्या झोपडीसह दोघांना जिवंत पेटवून दिले, अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

घृणास्पद! आजी-आजोबांनी केला सेक्स, नातीला जबरदस्ती बघायला लावले

रक्षाबंधनासाठी पत्नी माहेरी गेली; संतापलेल्या पतीने पोटच्या मुलीला ठार मारलं


या घटनेनंतर गंभीर अवस्थेत दोघांनाही जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीररित्या होरपळलेल्या २३ वर्षीय भोलाचा मृत्यू झाला आहे. तर तरुणी ही ८० टक्के होरपळली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. तिथे ती मृत्यूशी झुंज देत आहे. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांपैकी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अन्य आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले.

बापरे! पत्नी आणि मुलांचे १०० तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवेन, पतीची धमकी कल्याण: मटका किंग हत्या प्रकरणी गुजरातमधून शार्प शूटर 'जपान'ला अटक

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज