अ‍ॅपशहर

रामानं जसा रावणाचा वध केला, तसाच मी माझ्या मेहुण्यांना संपवणार! FBवर दिली धमकी अन् मग...

उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका व्यक्तीनं आपल्या मेहुण्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. स्वत:ला राम म्हणवून घेत त्यानं आपल्या मेहुण्यांची तुलना रावण, कुंभकर्ण आणि बिभीषणाशी केली. ज्याप्रकारे रामानं रावणाचा वध केला होता, त्याचप्रमाणे मी माझ्या मेहुण्यांना मारणार असल्याचं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 10:50 am
बरेली: उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये एका व्यक्तीनं आपल्या मेहुण्यांचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला. स्वत:ला राम म्हणवून घेत त्यानं आपल्या मेहुण्यांची तुलना रावण, कुंभकर्ण आणि बिभीषणाशी केली. ज्याप्रकारे रामानं रावणाचा वध केला होता, त्याचप्रमाणे मी माझ्या मेहुण्यांना मारणार असल्याचं त्यानं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं. मेहुण्यांनी माझं कुटुंब उद्ध्वस्त केल्याचंही त्यानं पोस्टमध्ये नमूद केलं होतं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम fb post


दिनेशचा विवाह १८ वर्षांपूर्वी झाला. त्याचा पत्नीशी दररोज वाद व्हायचा. यामुळे त्रस्त झालेला दिनेशचा मेहुणा विनोद स्वत:च्या बहिणीला आणि तिच्या बहिणीला आपल्या घरी घेऊन आला. दिनेश अनेकदा पत्नीला आणण्यासाठी सासरवाडीत गेला. मात्र त्याच्या तिन्ही मेहुण्यांनी बहिणीला सासरी पाठवण्यास नकार दिला. दिनेश दिल्लीत सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.
गरबा पाहायला गेली, आईच्या मांडीवर बसली; डोक्यातून अचानक रक्तस्राव, मुलीचा रहस्यमय मृत्यू
विजयादशमीच्या दिवशी दिनेशनं तिन्ही मेहुण्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली. रावण श्रीरामाची पत्नी माता सीतेला उचलून घेऊन गेला. त्यानंतर रामानं रावणाचा वध केला. त्याचप्रकारे मी माझ्या तिन्ही मेहुण्यांना बंदुकीनं मारुन टाकेन, अशी फेसबुक पोस्ट दिनेशनं केली. दिनेशनं त्याच्या तिन्ही मेहुण्यांचा फोटो पोस्टमध्ये वापरला होता.
'तो' फोटो अखेरचा ठरला! एकीला वाचवण्यासाठी ६ जणांच्या एकापाठोपाठ उड्या; सगळे बुडाले
दिनेशनं दिलेली धमकी पाहून तिन्ही मेहुण्यांनी दिनेशविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दिनेशनं आपल्याला व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवूनही धमकी दिल्याचा दावा त्याचा मेहुणा विनोदनं केला. त्यानं फेसबुक पोस्ट आणि व्हॉट्सऍप मेसेजचा स्क्रीनशॉट पोलिसांना दिला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज