अ‍ॅपशहर

IT इंजिनीअर महिलेला पुण्यात लुटणाऱ्यांना दिल्लीतून केली अटक

पुण्यात आयटी इंजिनीअर महिलेचे अपहरण करून लुटणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांनी दिल्लीतून अटक केली. कार चालवण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने या महिलेला कारमध्ये बसवून तिचे अपहरण केले होते.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2020, 12:00 pm
पुणे : आयटी इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या महिलेला कार चालविण्याचे प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अपहरण करून लुटल्याप्रकरणी शुक्रवारी आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने दिल्लीत आरोपींना जेरबंद केले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम IT इंजिनीअर महिलेला पुण्यात लुटणाऱ्यांना दिल्लीतून केली अटक


राजेशसिंह माही (वय ३९, रा. मेरठ, उत्तर प्रदेश) आणि कृष्णा रामबहादूर राणा (वय ३०, रा. महिपालपूर, दिल्ली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन्ही आरोपींना घेऊन तपास पथक पुण्याकडे निघाल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग यांनी दिली.

गाडी शिकविण्याच्या बहाण्याने आरोपींनी मंगळवारी महिलेला लुटले होते. पिसोळी येथे नेऊन तिला गाडीच्या सीटला बांधले. महिलेच्या हातातील अंगठ्या कटरने कापून घेतल्या तसेच, गुगल पे आणि एटीएम कार्डमधून जबरदस्तीने पैसे काढून एक लाख ८३ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास करताना युनिट पाचच्या पथकाने दोघा आरोपींना ताब्यात घेतले.

महिलेला लुटल्यानंतर आरोपींनी कॅबने मुंबई गाठली. तेथून ते दिल्लीला गेले. गुन्ह्याचा तपास करत असताना तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यापाठोपाठ पोलिसांचे पथक विमानाने दिल्लीत पोहोचले. आरोपी सिंह स्टडफार्म येथे काम करण्याबरोबरच गाडी चालवतो.

पुणे: कार ड्रायव्हिंग शिकवतो सांगून IT इंजिनीअर महिलेला घेऊन गेला, हात बांधले अन्

गर्लफ्रेंडला दिवाळीला कार गिफ्ट करायची होती, त्याने लुटले ४० लाख

मुंबई: उद्योजकाच्या घरात घुसले सशस्त्र लुटारू, मुलगी बेडरूममध्ये पळाली अन्...

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज