अ‍ॅपशहर

पतीच्या मित्रासोबत होतं अफेअर; 'असा' रचला पतीच्या हत्येचा कट

पतीची हत्या करणाऱ्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. झारखंडमधील दुमका जिल्ह्यात ही घटना घडली होती. प्रेमसंबंधांत अडथळा ठरणाऱ्या पतीच्या हत्येचा पत्नीनेच कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते.

Edited byटीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2020, 5:32 pm
दुमका: झारखंडच्या दुमका जिल्ह्यातील तालझारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ नोव्हेंबर रोजी सुनील दास या व्यक्तीच्या हत्येचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तुल, जिवंत काडतुसे आणि कारही जप्त केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पतीच्या मित्रासोबत होतं अफेअर; असा रचला पतीच्या हत्येचा कट


पोलिसांनी या हत्या प्रकरणाची माहिती दिली. तालझारी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोतिहारा नदीच्या काठावर १२ नोव्हेंबरला बरमनिया गावातील रहिवासी सुनील दास याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांत माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुनील याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीनंतर त्याला मृत घोषित करण्यात आले होते. या प्रकरणी तालझारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी जरमुंडीचे पोलीस अधिकारी अनिमेष नथानी, पोलीस निरीक्षक प्रभूनाथ प्रसाद आणि तालझारी पोलीस ठाण्याचे प्रभारी दिनेश कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली पथक स्थापन करण्यात आले होते. चौकशीदरम्यान, पोलिसांना मृताच्या पत्नीवर संशय आला. त्यांनी कसून चौकशी केली असता, या हत्येचा उलगडा झाला, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

मृताची पत्नी लीलू भारती बिहारच्या बांका जिल्ह्यातील रजौन पोलीस ठाण्याच्या हद्दीत एएनएम पदावर कार्यरत होती. तिचे सुनीलचा मित्र योगेश दास याच्यासोबत अनैतिक संबंध होते. प्रेमात अडथळा ठरणाऱ्या पतीच्या हत्येचा कट तिने रचला होता. पोलिसांनी पत्नी लीलू आणि योगेशला अटक केली. लीलू भारतीने पतीचा मित्र योगेशच्या मदतीने त्याची हत्या केली होती. हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे.

ऐतिहासिक स्मारकाजवळील चंदनासह अनेक झाडे चोरीला, 'पुरातत्व'ची पोलिसांत धाव

शोरूम मालकाच्या मुलीला पाठवायचा अश्लील व्हिडिओ, अखेर तिने...

भारती सिंहचा पती हर्ष लिंबाचियाला अटक;१७ तासांच्या चौकशीनंतर कारवाई

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज