अ‍ॅपशहर

घटस्फोटाचा अर्ज, फॅमिली कोर्टानं समजावलं; बाहेर येताच पतीनं टोकाचं पाऊल उचललं

समुपदेशनानंतर पती पत्नीसोबत राहण्यास तयार झाला. न्यायमूर्तींसमोर त्यानं सोबत राहण्याची तयारी दर्शवली. पत्नीला घेऊन पती न्यायालयातून बाहेर पडला. त्यानंतर त्यानं पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा कापला. त्यामुळे एकच खळबळ माजली.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Aug 2022, 9:04 pm
बंगळुरू: कर्नाटकमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एका पतीनं त्याच्या पत्नीची गळा चिरुन हत्या केली आहे. दोघांनी एकमेकांविरोधात कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. समुपदेशनानंतर पती पत्नीसोबत राहण्यास तयार झाला. न्यायमूर्तींसमोर त्यानं सोबत राहण्याची तयारी दर्शवली. पत्नीला घेऊन पती न्यायालयातून बाहेर पडला. त्यानंतर त्यानं पत्नीवर हल्ला केला. तिचा गळा कापला. त्यामुळे एकच खळबळ माजली. तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम man kills wife
पतीनं केली पत्नीची हत्या


होलेनरसीपुरा शहर न्यायालयात ही घटना घडली. चैत्रा (२८) असं मृत महिलेचं नाव असून ती थट्टेकेरे गावची रहिवासी होती. तिचा पती शिवकुमार (३२) पोलिसांच्या ताब्यात आहे. तो होलेनरसीपुरा तालुक्याचा रहिवासी आहे. दोघांचा विवाह ७ वर्षांपूर्वी झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोबत न राहण्याचा निर्णय घेतला. प्रकरण न्यायालयात गेलं. आम्हाला सोबत राहायचं नसल्याचं त्यांनी अर्जात म्हटलं होतं. मात्र कायद्यानुसार दोघांचं समुपदेशन सुरू होतं. त्यासाठी त्यांना न्यायालयात बोलावण्यात आलं होतं.
१५ साप, ५ अजगर, २ कासवं, १ माकड! एअरपोर्टवर प्रवाशाला अडवले; बॅगेत दुर्मीळ प्राणी सापडले
दोन मुलांकडे पाहून आपण पत्नीसोबत झालेले मतभेद बाजूला ठेवू असं आश्वासन शिवकुमारनं न्यायालयाला दिलं. यानंतर शिवकुमार चित्राला घेऊन न्यायालयातून निघाला. चैत्रा शौचालयात जात असताना शिवकुमारनं मागून तिचा गळा कापला. पत्नीवर वार केल्यानंतर शिवकुमारनं त्यानं आपल्या मुलांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या लोकांनी त्याला रोखलं.
कार तुझ्या बापाची आहे का? महिलेनं ९० सेकंदांत रिक्षावाल्याला १७ वेळा थोबाडीत मारली
पत्नीवर वार केल्यानंतर शिवकुमारनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी त्याला मागून पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. चैत्राला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख