अ‍ॅपशहर

कोल्हापूर: व्यापाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा; ८० किलो वजनाची तिजोरी फोडली

कोल्हापूरमधील करवीर तालुक्यात एका व्यापाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा पडल्याची घटना घडली आहे. बंगल्यातील ८० किलो वजनाची तिजोरी फोडून त्यातील सोन्याचांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केली.

Edited byनंदकुमार जोशी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Nov 2020, 4:18 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: करवीर तालुक्यातील वडणगे येथे साई दत्त कॉलनीतील किराणा व्यापारी अनिल सादुले यांच्या बंगल्यात चोरी झाली. चोरट्यांनी १५ तोळे सोन्याचे दागिने, दोन किलो चांदी असा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याबाबत अनिल सादुले (वय ५५, मूळ रा. उत्तरेश्वर पेठ, कोल्हापूर) यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम कोल्हापूर: व्यापाऱ्याच्या बंगल्यावर दरोडा; ८० किलो वजनाची तिजोरी फोडली


करवीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वडणगे ते निगवे मार्गावर साईदत्त कॉलनी आहे. या परिसरात स्वतंत्र सहा ते सात बंगले आहेत. या ठिकाणी किराणा व्यापारी अनिल सादुले यांचा बंगला आहे. सादुले कुटुंबीय दिवाळीनिमित्त कोल्हापुरातील घरी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांचा बंद बंगल्याच्या खिडकीचे गज वाकवून आत प्रवेश केला. बेडरूममधील ८० किलो वजनाची तिजोरी फोडून दीड तोळ्याच्या सोन्याच्या दोन चेन, एक तोळ्याचे लॉकेट, दीड तोळ्याच्या अंगठ्या, दीड तोळ्याची सोन्याची नाणी, चार ग्रॅमचे कानातील झुमके असे १५ तोळे सोने, दोन किलो चांदी चोरट्यांनी लांबवली.

परिसरातील नागरिकांना चोरीचा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास लक्षात आला. त्यांनी याबाबतची माहिती अनिल सादिले यांना कळवली. सादुले यांनी घरी येऊन पाहणी केली असता, घरातील सर्व साहित्य विस्कटले होते. सोन्याचे व चांदीचे दागिने चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी करवीर पोलीस ठाण्यात फोन करून चोरीची माहिती दिली. पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, उपनिरीक्षक भोसले यांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

महिला एसटी बसची वाट बघत होती, कारचालकाने लिफ्ट दिली अन्...

नाशिक: 'तो' पेट्रोल पंपावर आला अन् अवघ्या काही मिनिटांत...

नवी मुंबई: बर्थडे सेलिब्रेशन भोवलं, भाजप नगरसेवकावर गुन्हा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज