अ‍ॅपशहर

प्रेयसीला निर्घृणपणे संपवलं, मग ३०० लीटरचा फ्रिज आणला; प्रियकर रोज रात्री दोनला निघायचा अन्...

Live-in Partner Murder: श्रद्धा विकास वॉकर खून प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. आरोपी लिव्ह इन-पार्टनर अफ्ताब अमीन पुनावालानं मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी स्थानिक बाजारात असलेल्या तिलक इलेक्ट्रॉनिक्समधून ३०० लीटरचा फ्रिज खरेदी केला होता.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Nov 2022, 5:59 pm
नवी दिल्ली: श्रद्धा विकास वॉकर खून प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. आरोपी लिव्ह इन-पार्टनर अफ्ताब अमीन पुनावालानं मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी स्थानिक बाजारात असलेल्या तिलक इलेक्ट्रॉनिक्समधून ३०० लीटरचा फ्रिज खरेदी केला होता. त्यातच त्यानं श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे ठेवले.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम aftab shraddha


श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी अफ्ताबनं मृतदेहाचे तुकडे केले. तो राज रात्री रात्री २ वाजता फ्लॅटमधून निघायचा आणि मृतदेहाचा एक तुकडा जंगलात फेकून परत यायचा. जवळपास १६ दिवस त्यानं तुकडे फेकले. आरोपीनं शेफचं प्रशिक्षण घेतलं गोतं. त्यामुळे त्याला एखाद्या वस्तूचे तुकडे कसे करतात याची कल्पना होती.
तुझ्या भावाला ४ वर्षांपूर्वी मीच मारलं, घरात गाडलं! शेजाऱ्याचं ऐकून भावानं खड्डा खणला अन्...
श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फेकून अफ्ताब सामान्यपणे जगत होता. त्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय आला नाही. ज्या खोलीत श्रद्धाची हत्या केली, त्याच खोलीत अफ्ताब राहायचा. हत्याकांडानंतर तो झोमॅटोवरून जेवण मागवायचा. अफ्ताबला श्रद्धाच्या हत्येबद्दल कोणताही खेद नाही.

घरात प्रेयसीच्या मृतदेहाचे तुकडे ठेऊन अफ्ताब अतिशय शांतपणे जगत होता. श्रद्धाचा खून झाल्याचं आसपास असलेल्या कोणालाही समजलं नाही. बाहेर दुर्गंध पसरू नये म्हणून अफ्ताबनं फ्लॅटमध्ये अगरबत्ता लावल्या. या प्रकरणात पोलिसांनी डिजिटल रेकॉर्ड आणि इलेक्ट्रॉनिक फूट प्रिंट तपासले. त्यामुळे पोलिसांना आरोपीविरोधात पुरेसे पुरावे सापडले.
शाब्बास मुंबई पोलीस! ९७ सिम, १६७ CCTV तपासले; पोस्टमन, फळवाले बनले; मिशन अलीबाबा यशस्वी
श्रद्धा आणि अफ्ताब यांच्या प्रेम संबंधांना कुटुंबियांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी मुंबई सोडली आणि दिल्लीला आले. ८ मे रोजी त्यांनी दिल्ली गाठली. एक रात्र ते पहाडगंड हॉटेलात थांबले. त्यानंतर सैजदुल्लाजाब हॉस्टेलवर थांबले. सगळी लोकेशन त्यांनी गुगलवर शोधली होती.

एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना श्रद्धा आणि अफ्ताबची ओळख झाली. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. मात्र त्याला कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघे दिल्लीला गेले. श्रद्धा अफ्ताबकडे लग्नाचा आग्रह धरत होती. याच मागणीला कंटाळून अफ्ताबनं श्रद्धाला संपवलं. बरेच दिवस श्रद्धाबद्दल काही माहिती न मिळाल्यानं तिच्या वडिलांना संशय आला. त्यांनी श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी अफ्ताबचं लोकेशन ट्रॅक केलं. त्याच्याविरोधात पुरावे गोळा केले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख