ठाणे: ठाण्यातील कळवा परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती भांडणातून पतीने आपल्या सहा महिन्यांच्या गरोदर पत्नीला पेटवून दिले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील कळवा परिसरातील मफतलाल कॉलनीत अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर पतीने तिला पेटवून दिले. महिला सहा महिन्यांची गरोदर होती, अशी माहिती समोर आली आहे. या घटनेमध्ये अर्भकाचा गर्भातच मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपी पतीला बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कळवा पूर्वेकडील परिसरात राहते. आरोपीने अन्य एका महिलेशी विवाह केला आहे. यावरून त्या दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. ३० ऑक्टोबर रोजी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर आरोपी पतीने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यात ती भाजली आहे. या घटनेमध्ये गर्भातच अर्भकाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर जखमी अवस्थेत शेजाऱ्यांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर कळवा पोलिसांनी ३५ वर्षीय आरोपी पतीला अटक केली आहे. त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.