अ‍ॅपशहर

वर्षभरापूर्वी ICICIमध्ये रुजू झाला; प्लान रचला, १२ कोटी पळवले; लूक बदलला, २ महिन्यांनंतर...

ठाण्यातील मानपाडा येथील आयसीआयसीआय बँकेतून १२ कोटी लांबवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पुण्यातून आरोपीला अटक करण्यात आली. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Oct 2022, 1:31 pm
मुंबई: ठाण्यातील मानपाडा येथील आयसीआयसीआय बँकेतून १२ कोटी लांबवणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर पुण्यातून आरोपीला अटक करण्यात आली. बुधवारी ही कारवाई करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम icici theft


पोलिसांनी आरोपीकडून ९ कोटी रुपयांची रोकड ताब्यात घेतली. अल्ताफ शेख (४३) असं आरोपीचं नाव आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला तो पाचवा आरोपी आहे. याआधी पोलिसांनी त्याची बहिण निलोफरलादेखील अटक झाली आहे. मानपाड्यातील आयसीआयसीआय बँकेतून १२ जुलैला १२ कोटी रुपये लंपास झाले होते. अल्ताफ शेख या चोरीतील मुख्य आरोपी होता.
रामानं जसा रावणाचा वध केला, तसाच मी माझ्या मेहुण्यांना संपवणार! FBवर दिली धमकी अन् मग...
अल्ताफ शेख वर्षभरापूर्वी आयसीआयसीआय बँकेत कस्टोडियन म्हणून कामाला लागला. बँकेच्या लॉकरच्या चाव्या सांभाळण्याचं काम त्याच्याकडे होतं. वर्षभर काम करत असताना त्यानं चोरीची योजना आखली. संपूर्ण यंत्रणेत असलेल्या त्रुटी त्यानं हेरल्या. त्यांचा वापर त्यानं चोरीसाठी केला. चोरी यशस्वी करण्यासाठी शेखनं एसीची डक्ट स्पेस वाढवली. त्यातून रोकड बाहेर टाकता येईल याची खातरजमा केली. सीसीटीव्ही फुटेजसोबत छेडछाड करून चोरीचा पुरावा नष्ट केला.

अलार्म बंद करून सीसीटीव्हीशी छेडछाड केल्यावर शेखनं बँकेची तिजोरी उघडली. त्यानं रोकड डक्टमध्ये टाकली. तिथून ती कचरा टाकण्यासाठी असलेल्या पाईपमध्ये सरकवली. पैसे गायब झाल्याचं लक्षात आल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांना चोरीबद्दल समजलं. सीसीटीव्हीचा डीव्हीआरही गायब असल्यानं प्रकरणाचं गांभीर्य वाढलं.
वय २३ वर्ष, वजन १५० किलो; खांद्यावर ३ स्टार; सगळे पोलीस निरीक्षक समजायचे, पण तो भलताच निघाला
शेख पैसे घेऊन फरार झाला. आपली ओळख समोर येऊ नये म्हणून त्यानं लूक बदलला. ओळख लपवण्यासाठी बुरखा वापरू लागला. शेखची बहिण निलोफरला या चोरीची कल्पना होती. तिच्या घरात काही रोकड लपवण्यात आली. या प्रकरणात ती सहआरोपी असून तिला अचक करण्यात आली आहे. शेखला अडीच महिन्यांनंतर पुण्यातून अटक करण्यात आली.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज