अ‍ॅपशहर

मंगळवारी मटण का करताय? नवरा-बायकोचं कडाक्याचं भांडण; दोघांच्या वादात शेजाऱ्याचा जीव गेला

Crime News: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पती-पत्नीचा वाद झाला. या भांडणात शेजाऱ्याचा जीव गेला. मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पती-पत्नीचं भांडण झालं. पती पत्नीला मारत होता. ती वाचवा वाचवा ओरडत होती. तिचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावला. त्यानं वाद सोडवला आणि मग घरी परतला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2022, 1:19 pm
भोपाळ: मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये पती-पत्नीचा वाद झाला. या भांडणात शेजाऱ्याचा जीव गेला. मंगळवारी घरात मटण तयार करण्यावरून पती-पत्नीचं भांडण झालं. पती पत्नीला मारत होता. ती वाचवा वाचवा ओरडत होती. तिचा आवाज ऐकून शेजारी मदतीसाठी धावला. त्यानं वाद सोडवला आणि मग घरी परतला. मात्र थोड्या वेळानं पती त्याच्या घरात काठी घेऊन शिरला. त्यानं केलेल्या हल्ल्यात शेजाऱ्याच्या डोक्याला इजा झाली. थोड्या वेळानं त्याचा मृत्यू झाला. आरोपी पती फरार झाला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mutton


पप्पू असं आरोपीचं नाव आहे. पप्पूची पत्नी कुंती बाईनं घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. तो शवविच्छेदनासाठी रुग्णलयात पाठवण्यात आला. आरोपीच्या पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी पप्पूला अटक करण्यात आली. मी मंगळवारी घरात मटण तयार करत होतो. मात्र पत्नीनं विरोध केला. त्यामुळे वाद झाल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.
संतापजनक! रुग्णवाहिका मिळाली नाही; बापानं बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीतून नेला
आरोपीच्या पत्नीनं दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पतीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील चतुर्वेदी यांनी दिली. पप्पू मजुरी करतो. मंगळवारी मटण तयार करण्यावरून पती पत्नीमध्ये वाद झाला. तो सोडवायला आलेल्या बल्लूला पप्पूनं मारहाण केली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख