अ‍ॅपशहर

पुणे : मतिमंद महिलेला इमारतीवरून ढकलले

कोथरूडमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एका अल्पवयीन मतिमंद मुलीने ३३ वर्षीय मतिमंद महिलेला ढकलून देऊन, तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Authored byम. टा. प्रतिनिधी | महाराष्ट्र टाइम्स 1 Mar 2021, 10:08 am
पुणे : कोथरूडमधील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून एका अल्पवयीन मतिमंद मुलीने ३३ वर्षीय मतिमंद महिलेला ढकलून देऊन, तिचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. भुसारी कॉलनीतील सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान संस्थेच्या इमारतीमध्ये २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम पुणे : मतिमंद महिलेला इमारतीवरून ढकलले


ममता मोहन डोंगरे (वय ३३) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संस्थेच्या अनिता टापरे यांनी याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सावली मतिमंद व बहुविकलांग प्रतिष्ठान संस्थेत मतिमंद व विकलांग मुला-मुलींचा सांभाळ केला जातो. २६ फेब्रुवारीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या रॅम्पवर ममता चालत होती. त्या वेळी अल्पवयीन मुलीने ममताला पाठीमागून येऊन, पकडून दुसऱ्या मजल्यावर नेले. त्यानंतर इमारतीवरून ढकलून देऊन, तिचा खून केला. अल्पवयीन मुलगी मुंबई येथील असून, तिला ताब्यात घेतले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक ए. एल. घोडके तपास करीत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज